22 June, 2026

एकल महिला दिनानिमित्त 29 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा

 

हिंगोली, दि. २२  (जिमाका) :- महिला व बाल विकास विभागाच्या निर्देशानुसार दि. २३ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायत स्तरावर एकल महिला दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सोमवार, दि. 29 जून २०२६ रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

दरम्यान, शासनस्तरावर एकल महिला धोरण तयार करण्यासाठी नागरिकांचे अभिप्राय मागविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर एकल महिलांसाठी कार्य करणाऱ्या महिला स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्त्या तसेच संबंधित व्यक्तींनी धोरणाबाबत सूचना व अभिप्राय सादर करण्यासाठी या कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

एकल महिलांसाठी काम करणाऱ्या इच्छुक महिला स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी दि. 29 जून २०२६ रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

----*

No comments: