21 June, 2026

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

 



हिंगोली(जिमाका), दि. 21 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसर, हिंगोली येथे योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात योगाचे महत्त्व, नियमित योगाभ्यासाचे आरोग्यदायी फायदे तसेच निरोगी जीवनशैलीसाठी योगाचे योगदान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थिनींनी विविध योगासने व प्राणायामाचा सराव करून योग दिनात सक्रिय सहभाग नोंदविला.

यावेळी योग शिक्षिका व महिला पतंजली जिल्हाध्यक्ष ज्योती शेळके, संवाद प्रभारी पूजा चौरसिया, श्रीमती चौंडेकर, श्रीमती दारवेकर, श्रीमती कांदे, श्रीमती मंगला चव्हाण तसेच श्रीमती सुलोचना ढोणे (गृहपाल) व श्रीमती धनश्री अवचार (गृहपाल) उपस्थित होत्या. दोन्ही शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थिनी तसेच कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

योगामुळे शारीरिक, मानसिक व भावनिक स्वास्थ्य वृद्धिंगत होत असल्याने विद्यार्थिनींनी नियमित योगाभ्यास करावा, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.

********

No comments: