हिंगोली (जिमाका), दि. 02 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांच्या अधिपत्याखाली हिंगोली जिल्ह्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी एकूण 8 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. यामध्ये मुलांसाठी 4 व मुलींसाठी 4 शासकीय वसतिगृहांचा समावेश असून एकूण 750 प्रवेश क्षमतेपैकी 220 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवर प्रवेश घेण्यासाठी पात्र मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
आयुक्तालयाच्या परिपत्रकानुसार सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 8 वीमध्ये प्रवेशित शालेय विद्यार्थ्यांनी दि. 30 जून 2026 पर्यंत, तर इयत्ता 11 वी (कनिष्ठ महाविद्यालय) तसेच पदवी व वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांनी दि. 15 जुलै 2026 पर्यंत शासनाच्या hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
हिंगोली जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांमधील रिक्त जागांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मुलांचे शासकीय वसतिगृह
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, हिंगोली – 36 जागा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, वसमत – 25 जागा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, कळमनुरी – 30 जागा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, सेनगाव – 38 जागा
मुलींचे शासकीय वसतिगृह
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह क्र. 1, हिंगोली – 4 जागा
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह क्र. 2, हिंगोली – 39 जागा
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह, कळमनुरी – 25 जागा
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह, वसमत – 23 जागा
अशा प्रकारे एकूण 220 रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक व पात्र मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विहित मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज करून शासकीय वसतिगृह सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment