प्रधानमंत्री किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी
14 सप्टेंबर पर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक
हिंगोली (जिमाका), दि. 14 : प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया 14 सप्टेंबर, 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. या मुदतीत ई-केवायसी प्रमाणिकरण प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थीस प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही.
त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी www.pmkisan.gov.
अधिक माहितीसाठी कृषी विभागातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच तलाठी आणि महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
****
No comments:
Post a Comment