जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांनी कै.गौतम नरवाडे यांच्या कुटुंबाचे केले सांत्वन
हिंगोली (जिमाका), दि. 19 : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील गौतम नरवाडे यांचा दि. 1
सप्टेंबर, 2022 रोजी निघृण खून झाला होता. त्यानुसार अनुसूचित जाती, जमाती
अत्याचार प्रतिबंध नियमानुसार आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुरनं. 434/2022,
कलम 302, भादवि सहकलम 3(2)(5) अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक नियमान्वये
खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांनी कै. गौतम नरवाडे यांच्या खून प्रकरणात पिडीत राजरत्न गौतम
नरवाडे यांच्या घरी भेट देऊन नरवाडे कुटुंबाचे सांत्वन केले.
यावेळी शासनाद्वारे अनुसूचित जाती, जमाती अत्याचर प्रतिबंध
नियमान्वये तात्काळ मदत म्हणून जिल्हाधिकारी यांनी 4 लाख 12 हजार 500 रुपये
अर्थसहाय्य तात्काळ मंजूर केले. तसेच गुन्हेगारांवर कठोर कार्यवाही करण्याबाबत
पिडित कुटुंबास आश्वस्त केले.
यावेळी कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, समाज कल्याणचे
सहायक आयुक्त एस.के. मिनगीरे, तहसीलदार सुरेखा नांदे, सहायक पोलीस निरीक्षक
बोधनपोड हे उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment