क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप
हिंगोली (जिमाका), दि. 21 : राष्ट्रीय
क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व क्षयरुग्णांना आहाराचा सपोर्ट
करण्यासाठी ‘निश्चय मित्र’ या माध्यमातून मदत केली जाते. आज दि. 21 सप्टेंबर, 2022
रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत
या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यात टीबी रुग्णांना आहार देण्यासाठी पुढाकार
घेतलेल्या सर्व दात्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यासोबतच या दातांकडून
प्राप्त अन्नधान्याच्या किट रुग्णांना वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थित अतिरिक्त
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर,सहायक
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.गणपत मिरदुडे, तालुका
आरोग्य अधिकारी डॉ.नामदेव कोरडे,हिंगोली व जिल्हा क्षयरोग कार्यालय व सामान्य
रुग्णालय येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment