12 September, 2022

 

जिल्हा उद्योग केंद्राकडून चारचाकी वाहनाचे मोफत प्रशिक्षण

 

हिंगोली (जिमाका), दि. 12 :  जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राकडून सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील युवक व युवतींसाठी चारचाकी वाहनाचे मोफत प्रशिक्षणाचे आयोजन सप्टेंबर 2022 या महिन्यात करण्यात आले आहे.

चारचाकी वाहन प्रशिक्षणासाठी उमेदवार हा किमान 8 वी पास असावा, वय 18 ते 45 असावे तसेच आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, टी.सी. मार्क मेमो, बँक पासबुक जमा करुन  दिनांक 13 सप्टेंबर, 2022 पर्यंत नाव नोंदणी करण्यात यावी.  नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी  सुभाष बोरकर (मो. 9921400577), कार्यक्रम आयोजक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. के. कादरी व प्रकल्प अधिकारी शंकर पवार यांनी केले आहे.

*****

No comments: