20 September, 2022

 

जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने टॅलीच्या मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 20 : जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांनी सेनगाव तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतीसाठी टॅली (Tally) च्या मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

            यासाठी उमेदवार हा किमान आठवी पास असावा. वय 18 ते 45 वर्षे असावे, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, टीसी, मार्क मेमो, बँक पासबूक जमा करुन दि. 25 सप्टेंबर, 2022 पर्यंत आपली नाव नोंदणी करावी. नाव नोंदण्यासाठी  व अधिक माहितीसाठी विकास उंडाळ (मो.8412089272), कार्यक्रम आयोजक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. के. कादरी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी शंकर पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

****

No comments: