जगातले सर्वात मौल्यवान दान म्हणजे रक्तदान
-सांस्कृतिक
कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
हिंगोली (जिमाका), दि. 17 : सुवर्णदान,
अन्नदान व इतर मौल्यवान धातूचे दान अतिशय महत्वाचे मानले गेले असले तरी
जगातले सर्वात मौल्यवान
दान म्हणजे रक्तदान आहे, असे प्रतिपादन
राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा दि. 17 सप्टेंबर पासून दि.
2 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येत आहे. यानिमित्त येथील मधूरदिप मंगल कार्यालयात रक्तदान
शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी
आमदार रामराव वडकुते, डॉ.जयदीप देशमुख, डॉ.सचिन बगडिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सांस्कृतिक मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, जगात
सर्व प्रकारचे शोध लावण्यात आले परंतु जगातल्या कोणत्याही शास्त्रज्ञांला रक्ताचा शोध
लावता आला नाही. त्यामुळे जेथे रक्ताची गरज आहे तेथे हे रक्त पोहोचणार आहे. या रक्तदान
शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यामुळे एखाद्याला जीवनदान मिळणार आहे. हे पुण्य रक्तदात्यांना
पुढच्या जन्मातही कामी येईल, असे सांगितले. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा
वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसापासून सर्वत्र राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा
साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त संपूर्ण पंधरवाड्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार
असल्याचे सांगितले.
यावेळी विविध पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व नागरिक मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment