ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 ऑक्टोबर रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 23 : ज्येष्ठ नागरिक दिन व सेवा पंधरवाडा विशेष मोहिमेंतर्गत सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दि. 1 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दर्गा रोड, रिसाला बाजार, हिंगोली येथे
ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले
आहे.
या आरोग्य शिबिरामध्ये जिल्हयातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या
संख्येने उपस्थित राहून आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त ,
समाज कल्याण, हिंगोली यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment