सर्व सेवांच्या
प्रलंबित अर्जाचा निपटारा करुन
सेवा पंधरवाड्याची यशस्वी अमंलबजावणी करावी
- जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 21 : शासनामार्फत देण्यात येत असलेल्या विविध सेवा नागरिकांपर्यंत
कालमर्यादेत पोहोचविण्यासाठी सेवा पंधरवाडा या उपक्रमातंर्गत सर्व सेवांच्या
प्रलंबित अर्जाचा मोहिम स्वरुपात निपटारा करुन यशस्वी अंमलबजावणी करावी, असे
निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व संबंधित विभागाना दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
यांच्या अध्यक्षतेखाली सेवा पंधरवडा, एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या परंतु
नियुक्ती पासून वंचित राहिलेले उमेदवारांची माहिती सादर करणे आदी विविध विषयांची
आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उप
मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, जिल्हा
सरकारी कामगार अधिकारी टी.ई.कराड, जिल्हा पशुसवंर्धन उपायुक्त लक्ष्मण पवार,
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे, वनीकरण विभागाचे विश्वास टाक
यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले की, शासनामार्फत देण्यात
येत असलेल्या विविध सेवा नागरिकांपर्यंत कालमर्यादेत पोहोचविण्यासाठी ‘राष्ट्रनेता
ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा' उपक्रम दि. 17 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर या
कालावधीत राबविण्यात येत आहे. सेवा पंधरवाड्याविषयी जनतेमध्ये जाणीव जागृती व्हावी
व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी व्यापक प्रमाणात प्रसिध्दी द्यावी. तसेच सेवा
पंधरवाड्यासंदर्भात जनजागृतीसाठी जिल्हा, तालुका, गावपातळीवर फ्लेक्स लावणे, लोकप्रतिनिधींचा
सहभाग घ्यावा. जेणेकरुन सामान्य जनतेला या उपक्रमाचा लाभ होईल. तसेच प्रत्येक
विभागाने 10 सप्टेंबर पर्यंतच्या प्रलंबित प्रकरणाची संख्या तयार करावी. त्यानुसार
दि. 17 सप्टेंबर पासून ते दि. 2 ऑक्टोबर पर्यंत या सर्व सेवेचा विहित वेळेत निपटारा
करुन त्याचा अहवाल द्यावा. तसेच 28 सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा करण्यात
यावा, 15 ऑक्टोंबर रोजी माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा
जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करावा. तसेच एसईबीसी प्रवर्गातून निवड
झालेल्या परंतु नियुक्तीपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांची माहिती सादर करावी, याबरोबरच
शासनाच्या महत्वाकांक्षी योजनाची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिले.
*****
No comments:
Post a Comment