राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 21 बाल रुग्णांच्या
विविध हृदय रोगांवर उपचारासाठी हिंगोलीतून वाहन मुंबई कडे रवाना
हिंगोली (जिमाका), दि. 29 : राष्ट्रीय
बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 21 बाल रुग्णांच्या विविध हृदय रोगांवर उपचार
करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी
झेंडी दाखवून मुंबईकडे रवाना करण्यात आली.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव
केंद्रे,
डॉ गोपाल कदम, डॉ.सचिन भायेकर, ज्ञानेश्वर चौधरी उपस्थित होते.
हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 16
सप्टेंबर रोजी 2डी.इको. तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 50
बालरुग्ण होते. त्यापैकी 21 बालरुग्णांची तपासणी केल्यानंतर 21 बालरुग्णांच्या
विविध हृदय रोगांवरील शस्त्रक्रिया करण्यासाठी आज दि. 29 सप्टेंबर रोजी एक बस
मुंबई कडे रवाना करण्यात आली. या 21 बालरुग्णांवर बालाजी हॉस्पिटल, भायखळा मुंबई
येथे विविध हृदय रोगांवरील शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
यावेळी डॉ.चुकेवार, डॉ.पतंगे, डॉ.दर्गु,
डॉ.कुहिरे, लक्ष्मण गाबने, ज्ञानोबा चव्हाण, गणेश जारे,
राजेंद्र खंडारे, सुरेश शेवाळे, दुर्गा डोंपे, अर्चना घुंगरे, वैशाली काईट, आराधना मोरे, आदी परिश्रम घेतले.
*****
No comments:
Post a Comment