केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलवाहतूक राज्यमंत्री शंतनू ठाकूर
यांनी घेतला
विविध योजनांचा आढावा
केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करावी
- केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर
* उमेद कयाधू विक्री केंद्र बचतगटाच्या स्टॉलचे केंद्रीय बंदरे,
जहाजबांधणी व जलवाहतूक राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
* राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडानिमित्त केंद्रीय
बंदरे, जहाजबांधणी व जलवाहतूक राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांच्या हस्ते विविध
प्रमाणपत्र व हेल्थ कार्डाचे वितरण
हिंगोली (जिमाका), दि. 22 : जिल्ह्यातील केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध योजनांची प्रभावीपणे
अंमलबजावणी करावी. तसेच प्रलंबित असलेली सर्व कामे योग्य नियोजन करुन तातडीने
पूर्ण करावेत, असे निर्देश केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलवाहतूक
राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी दिले.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलवाहतूक राज्यमंत्री शंतनू ठाकूर
यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी
आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार गजानन घुगे, माजी
आमदार रामराव वडकुते, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांची उपस्थिती होती.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री. ठाकूर यांनी जलजीवन मिशन योजना, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण
रोजगार हमी योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य
योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, प्रधानमंत्री
कृषी सिंचन योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, भूमि अभिलेख कार्यालयाचे
संगणकीकरण योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना,
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, डिजिटल इंडिया, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, गौण
खनिज, प्रधानमंत्री उद्योग योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना यासह अन्य केंद्रशासन
पुरस्कृत योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सन 2020-21 मध्ये झालेल्या अतिवृष्टीची पीक
विमा कंपनीकडून पीक विमा नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. ती मिळवून देण्यासाठी
संबंधित विभागाने पाठपुरावा करावा. तसेच जिल्ह्यात हळदीचे उत्पादन जास्त प्रमाणात
असल्याने येथे हळदीवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यासाठी नियोजन करावेत. यासाठी
केंद्र शासनाची मदत मिळवून देण्यात येईल. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फायदा
होईल, असे सांगितले.
आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी हिंगोली ते मुंबई
रेल्वे सुरु करण्यासाठी पाठपुरावा करावा. येथील नांदेड रोडवरील सुरु असलेले रेल्वे
उड्डाणपुलाचे काम जलदगतीने पूर्ण करावेत. तसेच आपणास दिलेली कामे सर्व यंत्रणांनी
नियोजन करुन वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना केल्या.
बैठकीच्या अगोदर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उमेद कयाधू विक्री केंद्र या बचतगटानी उत्पादित केलेल्या स्टॉलचे
उद्घाटन केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलवाहतूक राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांच्या
हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडानिमित्त
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलवाहतूक राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांच्या हस्ते
विवाह प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, नाहरकत प्रमाणपत्र, अपंग प्रमाणपत्र अशा विविध
प्रमाणपत्राचे, तसेच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना हेल्थ कार्डाचे
वितरण करण्यात आले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी
केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती सादरीकरद्वारे दिली. तसेच सर्व
उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जिह्यातील पदाधिकारी, विविध विभागांचे खाते प्रमुख उपस्थित
होते.
****
No comments:
Post a Comment