16 September, 2022

 

राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते

मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण

 

       हिंगोली (जिमाका), दि. 16 : मराठवाडा मुक्ती दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सकाळी 9-00 वाजता हुतात्मा स्मारक येथे होणार आहे. 

        मराठवाडा मुक्ती संग्रामाचे 17 सप्टेंबर, 2022 पासून अमृत महोत्सवी वर्ष सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या छायाचित्राचे, त्यांनी मुक्तीसंग्राम लढ्यात दिलेल्या योगदानाच्या माहितीचे प्रदर्शन आयोजित केले आहे. याचे उद्घाटन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.

****

No comments: