17 September, 2022

 

"स्वच्छता ही सेवा" या जनजागृती रथास हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ


 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्ह्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते " स्वच्छता ही सेवा" या जन जागृती  रथास हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आले आहे.

यावेळी उप मुख्य कार्य अधिकारी सर्वश्री. आनंतकुमार कुंभार,आत्माराम बोंद्रे, गणेश वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक संदीपकुमार सोनटक्के, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, जिल्हा परिषद कर्मचारी उपस्थित होते.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत " स्वच्छता ही सेवा" जनजागृती रथ संदेश   हिंगोली जिल्ह्यात ग्रामीण भागात दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर, २०२२ कालावधीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये गावांच्या दृष्यमान स्वच्छतेची राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात येणार आहे.  गावातील कचरा कुंड्या व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई, कचरा स्त्रोताच्या ठिकाणी (सुका व ओला) कचरा वेगळे करण्यासाठी जनजागृती करणे, कचरा संकलन आणि विलगीकरण , प्लॅस्टिकसारखा अविघटनशिल कचरा एकत्रित करुन नियोजन करणे, पाणवठ्यांजवळील परिसर स्वच्छ ठेवुन हागणदारी मुक्त अधिक  करण्यासाठी  जनजागृतीपर ग्रामीण भागात संदेश दिला जाणार आहे. 

*******

No comments: