आयात-निर्यात करणारे व उद्योन्नमुख उद्योजकांनी
27 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे
आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 23 : येथील जिल्हा उद्योग केंद्रामार्फत गुंतवणूक वृध्दी, व्यवसाय
सुलभीकरण, निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन या प्रमुख मुद्यांचा अंतर्भाव असलेली
एकदिवशीय जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या
अध्यक्षतेखाली दि. 27 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 10 ते 5 या कालावधीत जिल्हा
नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेस एक्सपोर्ट कन्सलटंट फॅकल्टी औरंगाबादचे सुरेश पारीख,
एसआयडीबीआय औरंगाबादचे भगवान चंदाणी, मैत्री कक्ष मुंबईचे श्री. महाजन, जिल्हा
ॲग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशीकांत सावंत, जिल्ह्यातील सर्व बँकाचे जिल्हा समन्वयक,
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे हे प्रामुख्याने उपस्थित राहून
मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व आयात-निर्यात करणारे तसेच उद्योन्नमुख उद्योजक
यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन एस.ए.कादरी, महाव्यवस्थापक, जिल्हा
उद्योग केंद्र, हिंगेाली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment