16 September, 2022

 

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे प्रस्ताव

15 ऑक्टोबर पूर्वी सादर करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 16 : एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये या हेतूने शासनाच्या सर्व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी सन 2022-23 मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठीचे प्रस्ताव प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.

त्यानुसार सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना इयत्ता 5 वी ते 7 वी (अनु.जाती, विजाभज/विमाप्र, इमाव स्वतंत्रपणे) , सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना इयत्ता 8 वी ते 10 वी (अनु.जाती, विजाभज/विमाप्र, इमाव स्वतंत्रपणे), अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी (अनु.जाती व विजाभज/विमाप्र स्वतंत्रपणे), गुणवत्ता शिष्यवृत्ती इयत्ता 5 वी ते 10 वी (अनु.जाती, अनु.जमाती व विजाभज/विमाप्र स्वतंत्रपणे), भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती अनु.जाती इयत्ता 9 वी व 10 वी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन, इयत्ता पहिली ते दहावीत शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, इयत्ता पहिली ते दहावीत शिकणाऱ्या विजाभज च्या विद्यार्थ्यांना डॉ.आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती अशा सर्व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे ऑफलाईन पध्दतीने प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत  दोन प्रतीत सोबत सॉफ्ट कॉपी पेनड्राईव्ह सह                    दि. 15 ऑक्टोबर, 2022 पूर्वी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली कार्यालयास सादर करावेत. जेणेकरुन मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाहीत. मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकांवर राहील, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

No comments: