केंद्र शासनाच्या
विविध पुरस्कारासाठी नामांकने सादर करण्याचे आवाहन
हिंगोली,
(जिमाका) दि. 05 : केंद्रशासनाच्या पत्रान्वये उप सचिव, भारत सरकार, युवा कार्यक्रम
एवं खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, खेळामध्ये यश
संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी (विद्यापीठांसाठी),
द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार, अर्जून अवार्ड-2022 च्या
पुरस्कारासाठी नामनिर्देशनाचा प्रस्ताव दि. 20 सप्टेंबर, 2022 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत
केंद्रशासनास सादर करावा. तसेच विहित कालावधीनंतर प्राप्त होणारे अर्ज अथवा अपूर्ण
अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे नमुद केलेले आहे. तसेच या वर्षीपासून पात्र खेळाडूंनी
पुरस्कारासाठी मार्गदर्शक तत्वानुसार (Award Guidelines) अर्जदारांना स्वतः फक्त ऑनलाईन
पोर्टलव्दारे आपले विहित नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची अथवा व्यक्तींची शिफारस
न घेता थेट केंद्रशासनास dbtyas-sports.gov.in या संकेतस्थळावर सादर करावे, असे
सुचित केले आहे. तसेच ऑनलाईन अर्जाबाबत काही अडचण आल्यास Department of Sports At section-sp4-moyas@gov.in, किंवा 011-23387432 या संपर्क क्रमांकावर
कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत सकाळी 9.00 ते सायं 5.30 पर्यंत संपर्क करता येईल,
तसेच केंद्रशासनाच्या विविध पुरस्काराची सविस्तर माहिती, नियमावली व विहित नमुना अर्ज http://yas.nic.in/sports या
संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय
कामगिरी केलेल्या खेळाडू, संघटक, क्रीडा शिक्षकांनी वरील संकेतस्थळावरील नियमावली व
विहित अर्जाचा नमुन्याचे अवलोकन करुन मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, खेळोमध्ये यश
संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी (विद्यापीठासाठी),
द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जून अवार्ड-2022 साठी
नामांकने दि. 20 सप्टेंबर, 2022 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी
संजय मुंढे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
*****
No comments:
Post a Comment