02 September, 2022

 

विकास योजनेमध्ये सार्वजनिक सोयी-सुविधांची आरक्षणे प्रस्तावित करण्यासाठी

गुगल फॉर्मवरील प्रश्नावली भरुन देण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : वसमत नगर परिषदेने ठराव क्र.07 दि. 11 फेब्रुवारी, 2021 अन्वये वसमत नगर परिषद हद्दीची विकास योजना, कळमनुरी नगर परिषदेने (मुळ हद्दीची दुसरी सुधारीत व अतिरिक्त क्षेत्राची सुधारीत) विकास योजना आणि नगर पंचायत औंढा नागनाथ ठराव क्र. 02 दि. 03 मार्च, 2021 अन्वये औंढा नगर पंचायत हद्दीची विकास योजना तयार करण्यासाठी  महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम -23 (1) सह कलम-38 अन्वये इरादा जाहीर केला आहे.

विकास योजनेमध्ये आवश्यक सार्वजनिक सोयी-सुविधांची आरक्षणे प्रस्तावित करण्यासाठी शहरातील स्थानिक जनतेचा सहभाग असणे आवश्यक आहे. जेणेकरुन जनतेच्या विकास योजनेबाबतच्या अपेक्षा व शहराची खरीखुरी निकड याबाबतची माहिती संकलित करणे यामुळे शक्य होईल.

यासाठी संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या दि. 2 ऑगस्ट, 2022 च्या पत्रान्वये माहिती संकलित करण्यासाठी प्रश्नावली उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या प्रश्नावली मधील माहिती भरुन अनुक्रमे नगर परिषद, वसमत, नगर परिषद कळमनुरी आणि नगर पंचायत औंढा नागनाथ या कार्यालयाकडे सादर करण्यात यावी. जनतेच्या सोयीसाठी प्रश्नावली मोबाईलद्वारे सादर करण्यासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. नगर परिषद, वसमत साठी https://forms.gle/v8WgkJvm2hYrJse3A ही लिंक, नगर परिषद कळमनुरी साठी https://forms.gle/3qf23imGXPFXfJUX8 आणि नगर पंचायत औंढा नागनाथ साठी https://forms.gle/koMNaNpFKmnDkKAd7 ही लिंक आहे. त्याअनुषंगाने संबंधित संकेतस्थळावर जाऊन फॉर्म मध्ये वस्तुस्थितीदर्शक माहिती भरावी आणि शेवटी सबमिट बटनवर क्लिक करावे.

ही विकास योजना पुढील 20 वर्षासाठी आवश्यक सोयीसुविधांबाबत असून त्याअनुषंगाने माहिती भरुन           दि. 4 सप्टेबर, 2022 पर्यंत जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन नगर रचना अधिकारी तथा सहायक संचालक, नगर रचना दि. ग. सरपाते यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

****

No comments: