वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री
सुधीर मुनगंटीवार यांचा हिंगोली दौरा
हिंगोली (जिमाका) दि.16 : वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर
मुनगंटीवार हे दिनांक 17 सप्टेंबर, 2022 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा
दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दिनांक 17 सप्टेंबर,
2022 रोजी सकाळी 6.45 वा. नांदेड विमानतळ येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी
8.15 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, सकाळी 8.40 वा. नगर परिषद उद्यान, देवडा
नगर, हिंगोली येथे मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्याच्या
कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 9.00 वा. मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन कार्यक्रमास उपस्थिती,
सकाळी 9.20 वा. स्वातंत्र्य सैनिकांच्या छायाचित्रांचे व स्वातंत्र्य सैनिकांनी मुक्ती
संग्राम लढ्यात दिलेल्या माहिती प्रदर्शनाचे
अनावरण. सकाळी 9.40 ते 10.15 वा. शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे राखीव, सकाळी
10.15 वा. मोटारीने बलसोंडकडे प्रयाण.
सकाळी 10.30 वा. बलसोंड
येथे आगमन व पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्म दिना निमित्त रक्तदान शिबीर उद्घाटन
समारंभास उपस्थिती. सकाळी 11.00 वा. राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
व लोकशाहीर स्व. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन (स्थळ : अंबिका टॉकीजजवळ,
हिंगोली), सकाळी 11.15 वा. सचिन गुंडेवार यांच्या निवासस्थानी राखीव (स्थळ : शिवाजीनगर),
दुपारी 12.00 वा. मोटारीने हिंगोलीहून नांदेडकडे प्रयाण.
000000
No comments:
Post a Comment