हिंगोली जिल्हा एक्सपोर्ट हब करण्यासाठी योगदान द्यावे
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यातील उद्योजकांना उद्योग विभागाच्या सहकार्याने निर्यादार
उद्योजक होण्याची मोठी संधी असून याचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि हिंगोली जिल्हा
एक्सपोर्ट हब म्हणून विकसित करण्यामध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यावेळी केले.
जिल्हा उद्योग केंद्र व स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ
इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने गुंतवणूक वृध्दी, व्यवसाय सुलभीकरण, निर्यात व
एक जिल्हा एक उत्पादन या प्रमुख मुद्यांचाअंतर्भाव असलेली एकदिवशीय जिल्हास्तरीय
कार्यशाळा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात
जिल्हाधिकारीधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 27 सप्टेंबर रोजी
घेण्यात आली.
यावेळी निर्यात सल्लागार सुरेश पारीख, मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी
डी.जी. महाजन, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, जिल्हा ॲग्रणी बँकेचे शशीकांत
सावंत, निर्यात उद्योजक प्रल्हाद बोरगड, नांदेड विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक
जितेंद्र देशमुख, उद्योग निरीक्षक आर.एल. आहेर, श्रीमती घन, मराठवाडा चेंबर्स ऑफ
कॉमर्सचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, निर्यातदार औद्योगिक संघटनेचे नंदकिशोर
तोष्णीवाल, ज्ञानेश्वर मामडे, प्रवीण सोनी, औद्योगिक समुहाचे प्रतिनिधी, फार्मर
प्रोड्यूसर कंपनीचे पदाधिकारी, नवउद्योजक, निर्यातदार उद्योजक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
यावेळी निर्यात सल्लागार सुरेश पारीख, मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी
डी.जी. महाजन, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, जिल्हा ॲग्रणी बँकेचे
शशीकांत सावंत, निर्यात उद्योजक प्रल्हाद बोरगड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन
केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक
एस.ए.कादरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा लांडगे यांनी केले. तसेच
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी शंकर पवार यांनी आभार
प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिटकॉनचे प्रकल्प अधिकारी सुभाष जाधव,
खादी व ग्रामोद्योग अधिकारी राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे पी.व्ही.मेंढे,
एस.जी.गोंड, एस.बी.शिंदे यांनी सहकार्य केले.
*****
No comments:
Post a Comment