राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर,
सदस्य
आर.डी.शिंदे, के.आर.मेढे यांचा 17 सप्टेंबर रोजी हिंगोली दौरा
हिंगोली (जिमाका), दि.
15 : राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष
ज.मो.अभ्यंकर, सदस्य आर.डी. शिंदे, के.आर. मेढे हे दि. 17 सप्टेंबर, 2022 रोजी
हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील
पुढीलप्रमाणे आहे.
दि. 17 सप्टेंबर, 2022 रोजी परभणी जिल्ह्यातील शिंगणापूर येथून
दुपारी 12.00 वाजता हिंगोलीकडे रवाना होऊन दुपारी 1.00 वाजता शासकीय विश्रामगृह,
हिंगोली येथे आगमन करतील. दुपारी 1.00 ते 2.00 वाजता अनुसूचित जातीच्या
व्यक्तीच्या खूनप्रकरणी जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक व सहायक आयुक्त समाज
कल्याण, हिंगोली यांच्यासोबत चर्चा. दुपारी 2.00 ते 3.00 राखीव. दुपारी 3.00 वाजता
हिंगोली येथून प्रयाण करतील.
No comments:
Post a Comment