शिष्यवृत्तीसाठी कार्यशाळेचे आयोजन
सर्व शाळेच्या
मुख्याध्यापकांनी व संबंधित कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 16 : जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत सन 2022-23 या शैक्षणिक,
आर्थिक वर्षासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना (इयत्ता 5 वी ते 10 वी),
राज्य शासनाची मॅट्रिकपूर्व शिक्षण फी, परीक्षा फी प्रतिपूर्ती योजना, माध्यमिक
शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
(इयत्ता 9 वी व 10 वी), अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना
शिष्यवृत्ती योजना, इयत्ता पहिली ते दहावीत शिकणाऱ्या इमाव विद्यार्थ्यांना भारत
सरकार शिष्यवृत्ती, विजाभज प्रवर्गातील इयत्ता पहिली ते दहावीत शिकणाऱ्या
विद्यार्थ्यांना डॉ.आंबेडकर शिष्यवृत्ती योजना सद्यस्थितीत ऑफलाईन पध्दतीने
राबविण्यात येणार आहेत.
त्याअनुषंगाने
जिल्ह्यातील संबंधित पंचायत समिती कार्यालयात दुपारी 12.00 वाजता कार्यशाळेचे
आयोजन करण्यात आलेले आहे. औंढा नागनाथ तालुक्यासाठी 19 सप्टेंबर रोजी, सेनगाव
तालुक्यासाठी 20 सप्टेंबर रोजी, वसमत तालुक्यासाठी 21 सप्टेंबर रोजी, कळमनुरी
तालुक्यासाठी 22 सप्टेंबर रोजी, हिंगोली तालुक्यासाठी 23 सप्टेंबर, 2022 रोजी
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
वरील नियोजित
दिनांकास सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी व संबंधित शाळेचे शिष्यवृत्तीचे काम
पाहणारे कर्मचारी यांनी कार्यशाळेस उपस्थित राहावेत. जेणेकरुन मागासवर्गीय
विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाहीत. पात्र विद्यार्थी
शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकांवर
राहील.
वरीलप्रमाणे
दिलेल्यास दिनांकास शाळांचे मुख्याध्यापक व संबंधित कर्मचारी यांनी कार्यशाळेस
उपस्थित राहावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प.हिंगोली यांनी केले
आहे.
****
No comments:
Post a Comment