कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 1 ते 18 वयोगटातील बालकांना
मुदत ठेव प्रमाणपत्राचे
पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त वितरण
हिंगोली,
(जिमाका) दि.27 :. कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 1 ते 18 वयोगटातील बालकांना
अर्थसहाय्य योजने अंतर्गत दिनांक 1 मार्च 2020 रोजी किंवा त्या नंतर कोरोना
संसर्गामुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक (आई व वडील) हे मृत्यु पावले आहेत. अशा बालकांकरीता
त्या बालकांच्या नावे एकरकमी रु.5 लक्ष रुपये इतकी रक्कम मुदत ठेव म्हणुन जमा करण्याची
तरतूद आहे. 26 जानेवारी रोजी संत नामदेव महाराज
पोलीस कवायत मैदान, हिंगोली येथे प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री वर्षाताई
गायकवाड यांच्या हस्ते जिल्ह्यातील पालक गमावलेल्या
अशा तीन बालकांना मुदत ठेव प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
या तीन
बालकांना शासनाने जाहिर केल्यानुसार एक रकमी रु.5लक्षाचे मुदत ठेव (FD) प्रमाणपत्र करण्यात आले आहे. महिला व बाल विकास विभागाच्या 17 जून 2021 रोजीच्या
शासन निर्णयान्वये कोरोना (कोविड-19) संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या
नावे एकरकमी रु.5 लक्ष इतकी रक्कम मुदत ठेव स्वरुपात संबंधित बालक व जिल्हा महिला व
बाल विकास अधिकारी यांचे नावे असणाऱ्या सामायिक बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. या कार्यक्रमात
जिल्ह्यामध्ये कोविड-19 काळामध्ये दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या भवितव्याची जबाबदारी
शासनाने घेतली आहे.
या कार्यक्रमास महिला व बाल विकास अधिकारी
विठ्ठल शिंदे, परिविक्षा अधिकारी सुनिल वाठोरे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती
कोरडे, क्षेत्र बाह्य कार्यकर्ता अनिरुध्द
घनसावंत आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment