जिल्ह्यात कोविड-19 चे
नवीन 144 रुग्ण ; तर 19 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज
· 384
रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली, (जिमाका) दि. 18 : जिल्ह्यात
144 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.
आज
प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 08
व्यक्ती, वसमत परिसर 10 व्यक्ती, कळमनुरी परिसर 08 व्यक्ती, औंढा परिसर 06 व्यक्ती
व सेनगाव परिसर 07 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 21 व्यक्ती, वसमत
परिसर 48 व्यक्ती, कळमनुरी परिसर 14 व्यक्ती, औंढा परिसर 19 व्यक्ती व सेनगाव
परिसर 03 व्यक्ती असे एकूण 144 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 19
कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये
भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 01 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे.
जिल्ह्यात
आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 16 हजार 543 रुग्ण
झाले असून, त्यापैकी 15 हजार 763 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज
घडीला जिल्ह्यात एकूण 384 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे
जिल्ह्यात आतापर्यंत 396 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र
सुर्यवंशी यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment