सुशिक्षीत बेरोजगारांसाठी
पंडित दिनदयाळ उपाध्याय
रोजगार मेळाव्याचे
ऑनलाईन आयोजन
हिंगोली, दि.19 (जिमाका) : सुशिक्षित बेरोजगार युवक - युवतींसाठी खाजगी रोजगाराच्या
संधी उपलब्ध करुन देण्यासाठी येथील जिल्हा
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून दि 27 जानेवारी ,2022 रोजी
पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ऑनलाईन आयोजन केले आहे.
या ऑनलाईन रोजगार मेळाव्यास धुत ट्रान्समिशन
प्रा.लि. औरंगाबाद, रक्षा सेक्युरीटी फोर्स हिंगोली, समस्था मायक्रो फायनान्स, स्टेट
बँक ऑफ इंडिया लाईफ इन्शोरन्स हिंगोली, उर्मिला मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटल हिंगोली,
लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल हिंगोली, साईनाथ
कॉम्पुटर अँड स्किल डेव्हलपमेंट सेंटर आखाडा बाळापूर या उद्योजकांनी सहभाग नोंदविला
असून त्यांना अनुक्रमे पुढील पदे भरावयाची आहेत – EPP Trainee , Security Guard,
Customer Relationship Officer, Insurance Adviser, Ward boy, Nurse,
Housekeeping, Coordinator, Project Manager.
या
रोजगार मेळाव्यास इच्छुकांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर
úEmployment/रोजगारú या पर्यायावर क्लिक करुन नोकरी साधक हा पर्याय निवडावा, युजर आयडी व पासवर्ड
व्दारे लॉग ईन करुन प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ
उपाध्याय रोजगार मेळावा या पर्यायाव्दारे हिंगोली जिल्हा निवडावा, इच्छुकांनी शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध उद्योजकांच्या
रिक्त पदांना Apply करावे, शैक्षणिक पात्रता धारक इच्छुक उमेदवारांनी या मेळाव्यास ऑनलाईन सहभागी व्हावे असे आवाहन रा.म.कोल्हे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार
व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment