पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री
जांभेकर यांना अभिवादन
हिंगोली, (जिमाका) दि. 06 : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील ‘दर्पण’ हे वृत्तपत्र 6
जानेवारी, 1832 रोजी प्रकाशित करुन मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली
होती. हा दिवस दरवर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त
येथील जिल्हा माहिती कार्यालयात आज बाळशास्त्री जांभेकर यांना पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन करण्यात आले.
यावेळी माहिती सहायक चंद्रकांत कारभारी, वरिष्ठ लिपिक आशाताई बंडगर,
लिपिक कैलास लांडगे, चंद्रकांत गोधने आदी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment