आरोग्य शिबिराच्या माध्यमातून
पत्रकारांची आरोग्य तपासणी
अभिनंदनीय आणि स्तूत्य उपक्रम
-- जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर
हिंगोली, (जिमाका) दि. 06 : पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य
शिबिरीच्या माध्यमातून पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी होणार आहे, हा उपक्रम अभिनंदनीय
आणि स्तूत्य आहे, असे सांगून पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांनी शुभेच्छा दिल्या .
आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांनी मराठी भाषेतील ‘दर्पण’ हे वृत्तपत्र
6 जानेवारी, 1832 रोजी प्रकाशित करुन मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली
होती. हा दिवस दरवर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त
आज येथील अग्रसेन चौकातील श्री गणेश इन येथे जिल्हा मराठी पत्रकार संघ, व्यापारी
महासंघ, जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार व त्यांच्या
कुटुंबियांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, कार्याध्यक्ष वसंत
भट्ट, हिंगोली तालुका अध्यक्ष प्रकाश इंगोले, व्यापारी महासंघाचे अनिल नैनवाणी, दिलीप
चव्हाण, गजेंद्र बियाणी, सुमित चौधरी, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी, वरिष्ठ लिपिक आशाताई बंडगर, पत्रकार
उपस्थित होते.
यावेळी बोलताना
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले, सध्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे.
पाझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणे प्रलंबित असलेले एक
लाख नागरिक आहेत. त्या सर्वांनी लवकरात लवकर दुसरा डोस घेऊन स्वत:ला संरक्षित करावे.
कोरोनाच्या नियमाचे सर्वांनी पालन करावे, मास्कचा वापर करुन सुरक्षित रहावे, असे
आवाहन केले.
यावेळी जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पुष्पहार अर्पण
करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment