बाल सरंक्षण कक्षाकडून रस्त्यावर राहणाऱ्या कुटुंबांतील मुलांचे सर्वेक्षण
- या सर्वेक्षणात 93 मुले आढळली
हिंगोली (जिमाका), दि. 12 : जिल्हा महिला व बाल विकास विभागांर्तगत जिल्हा
बाल संरक्षण कक्ष हिंगोलीकडून जिल्ह्यातील
बालकांच्या संदर्भात नियमित विविध उपक्रम राबविण्यात येतात. अशाच प्रकारे शासनाच्या
योजना मिळवून देण्यासाठी बाल संरक्षण कक्षाकडून जिल्ह्यातील शहरी भागामध्ये रस्त्यावर
राहत असलेल्या कुटुंबांमधील मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात 93 मुले
आढळून आले आहेत.
“
जी मुले आपल्या कुटुंबापासून दूर गेली आहेत आणि रस्त्यावर
राहत आहेत किंवा रस्त्यावर कुटुंबासह राहत आहेत किंवा जी मुले रस्त्यावर काम करतात
आणि कामानंतर कुटुंबात परत जातात त्यांना रस्त्यावरील मुले मानली जातात". हलाकीची परिस्थिती असलेले कुटुंब उदरनिर्वाहासाठी
तसेच काही जमातीमधील कुटुंब भिक्षा मागण्याच्या उद्देशाने शहरी भागामध्ये येतात. या
कुटुंबांमधील मुलांचा भिक्षा मागण्यासाठी व बाल कामगार म्हणून उपयोग केला जातो. अशी
मुले शिक्षणापासून वंचित राहतात, ही मुले गुन्हेगारीकडे वळू नये, त्यांना शिक्षण आरोग्य
तसेच इतर शासकीय योजना मिळाव्यात व सामाजिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासन स्तरावरुन
विविध प्रयत्न केले जातात. परिस्थिती त्यांना रस्त्यावरची मुले बनवते आणि त्यांच्याही
काही आशा आणि आकांक्षा आहेत. त्यांना रस्त्यावर आणणारा मार्ग हा त्यांच्या निवडीचा
नव्हता. अशा बालकांपर्यंत पोहचण्यासाठी बाल संरक्षण कक्षामार्फत जिल्ह्यामधील रस्त्यावर
राहणाऱ्या बालकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये
वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आलेल्या आहेत.
जिल्हा
महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या
मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक)
गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, विधी व परिविक्षा अधिकारी
ॲड.अनुराधा पंडीत, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक
कार्यकर्ता रेशमा पठाण व रामप्रसाद मुडे, माहिती
विश्लेषक शेख रफीक शेख जिलानी, डाटा एन्ट्री
ऑपरेटर राहुल सिरसाट, क्षेत्रबाह्य कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत तसेच चाईल्ड लाईन (1098) चे केंद्र समन्वयक आकाश
शिखरे, टिम मेंबर राजरत्न पाईकराव, विकास लोणकर, अंकुर पातोडे आदी कर्मचाऱ्यांडून जिल्ह्यातील
सर्वेक्षण करण्यात आले.
*****
No comments:
Post a Comment