व्यायामशाळा व क्रीडांगण विकास, युवक कल्याण अनुदानासाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 14 : येथील जिल्हा क्रीडा
कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षासाठी व्यायामशाळा व क्रीडांगण
विकास, युवक कल्याण अनुदानासाठी दि. 28 जानेवारी, 2022 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत
प्रस्ताव करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
नवीन
व्यायामशाळा विकास अनुदान योजनेसाठी दि. 16 जानेवारी, 2018 व दि. 8 जानेवारी, 2019
नुसार व्यायामशाळा साहित्य, खुल्या
व्यायाम शाळेसाठी शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय रुग्णालय, शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अनुदानित शाळा, महाविद्यालय, जिल्हा परिषद, सर्व
शासकीय प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वसतीगृह , समाज
कल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या अनुदानित शाळा, शासकीय उपजिल्हा रुग्णालय,
जिल्हा रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
शासनाने मान्यता दिलेल्या अनुदानित शैक्षणिक शाळा, महाविद्यालये, पोलीस कल्याण मंडळ,
पोलीस विभाग, शासकीय कार्यालये इत्यादीकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
क्रीडांगण अनुदान विकास योजनेसाठी दि. 7 सप्टेंबर,
2019 च्या शासन निर्णयानुसार क्रीडा साहित्य व क्रीडांगण विकासासाठी शासकीय शाळा, महाविद्यालये,
जिल्हा परिषद, सर्व शासकीय प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व
वसतीगृह, समाज कल्याण विभागांतर्गत चालविल्या
जाणाऱ्या अनुदानित शाळा, शासकीय उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासनाने मान्यता दिलेल्या अनुदानित
शैक्षणिक शाळा, महाविद्यालये, पोलीस कल्याण मंडळ, पोलीस विभाग, शासकीय कार्यालय इत्यादीकडून
प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
युवक
कल्याण अनुदान योजना सन 2020-21 या आर्थिक वर्षात शिल्लक राहिलेल्या प्रस्तावांना
प्राधान्यक्रमाने विचार करण्यात येणार असून लाभार्थ्यांनी त्रुटीची पूर्तता लवकरात
लवकर करावी. तद्नंतरच नवीन प्रस्तावांचा विचार करण्यात येईल. ज्या संस्थांना सन
2020-21 या वर्षात अनुदान देण्यात आले आहे. अशा संस्थांनी कार्यक्रमाचा अहवाल,
विनियोग प्रमाणपत्र, ऑडिट रिपोर्ट, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे कार्यरत
असल्याबाबतचे प्रमाणपत्र प्रस्तावासोबत सादर करावेत. धर्मादाय आयुक्तांनी रद्द
केलेल्या संस्थानी प्रस्ताव सादर करु नयेत. कार्यक्रमाचा अहवाल, विनियोग
प्रमाणपत्र सादर न केल्यास सदरील संस्था अपात्र करण्यात येईल.
यासाठी
लागणारे अर्जाचे विहित नमुने जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांच्या कार्यालयात
दि. 17 जानेवारी ते 28 जानेवारी, 2022 या कालावधीत सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 या
वेळेत विक्रीस उपलब्ध आहेत. परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दि. 28
जानेवारी, 2022 हा आहे. विहित मुदतीनंतर प्रस्ताव किंवा त्रुटीची पूर्तता केली जाणार
नाही. तसेच सादर करण्यात आलेल्या प्रस्तावातील त्रुटीची पूर्तता करण्यासाठी
कोणताही पत्रव्यवहार क्रीडा कार्यालयाकडून केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे
आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कलिमोद्दीन फारुखी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment