21 January, 2022

 

शेतातील पिक पेरा ऑनलाईन नोंदणीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

 

हिंगोली, (जिमाका) दि. 21 : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात आधारभूत दरानुसार राज्य शासनाने पणन महासंघाची शासनाची नोडल एजन्सी म्हणन नियुक्ती केलेली आहे. हंगाम 2021-22 मध्ये नाफेड / एफसीआयच्या वतीने तूर खरेदीसाठी  दिनांक 20 डिसेंबर,2021 पासून शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. प्रत्यक्षात खरेदी दिनांक 28 डिसेंबर,2021 पासून सुरु करण्यात आलेली आहे.

हंगाम 2021-22 पासून राज्य शासनाने शेतातील पिक पेरा नोंदणी ही ऑनलाईन ॲपवर करण्यातबाबत आदेशित केलेले आहे. परंतु काही कारणास्तव बऱ्याच शेतकरी बांधवाकडून पिक पेरा ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने शेतातील पिकपेरा ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी दि. 15 फेब्रुवारी, 2022 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. परभणी, हिंगोली जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवानी आपल्या शेतातील पिक पेरा नोंदणी ऑनलाईन ॲपवर करावी.

तसेच परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणी केलेला पिक पेरा आपल्या तालुक्यातील शासकीय खरेदी केंद्राच्या ठिकाणी नोंदणी करावी. नोंदणीसाठी सोबत खरीप हंगाम 2021-22 मधील पिक पेरा नोंद असलेला ऑनलाईन सातबारा, आधारकार्ड  झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स सोबत आणावे व बँक पासबूकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आय.एफ.एस.सी.कोड स्पष्ट असावा. ( जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देवू नयेत.).  शासकीय खरेदीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तूर नोंदणी करुन शासकीय हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे जिल्हा पणन अधिकारी जी. के. शेवाळे यांनी केले आहे.

****

No comments: