जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 04 रुग्ण, तर 01 रुग्ण बरा झाल्याने डिस्चार्ज
14 रुग्णांवर उपचार
सुरु
हिंगोली (जिमाका), दि. 06 : जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 04 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर 01 रुग्ण बरा झाल्याने
त्याला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज घडीला 14 कोविड-19 पॉझिटिव्ह
रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र
सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर
टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 04 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
जिल्ह्यात
आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 16 हजार
79 रुग्ण झाले असून, त्यापैकी 15 हजार 669 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज
घडीला जिल्ह्यात 14 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात
आतापर्यंत 396 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment