हिंगोली जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्या जाहीर
हिंगोली दि.6 (जिमाका) :
राज्य शासनाच्या दि. 6 जानेवारी , 1958 व 29 जून, 1982 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे प्राप्त
झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सन-2022 या वर्षाकरीता
हिंगोली जिल्ह्यासाठी पुढीलप्रमाणे स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.
दिनांक 4 मार्च, 2022 रोजी ( शुक्रवार) रथोत्सव यात्रा औंढा
ना.,दिनांक 25 एप्रिल 202 (सोमवार) रोजी हजरत चिरागसाह बाबा उर्स उत्सव आणि दिनांक
25 ऑक्टोबर 2022 (मंगळवार) रोजी अश्विन अमावस्या (दर्श अमावस्थ्या अभ्यंग स्नान
(दिपावली) निमित्त स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेच्या
कक्षेतील कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, जिल्ह्यातील शासकीय
कोषागारे, महामंडळाची कार्यालये व इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्था यांना लागू राहतील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment