प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा
माहिती कार्यालयात तंबाखू मुक्तीची शपथ
हिंगोली,
दि.26 (जिमाका) : संपूर्ण राज्यात कोव्हिड-19 च्या
तिसऱ्या लाटेचा प्रार्दुभाव दिसून येत
आहे. तंबाखुयुक्त पदार्थांचे सेवन केल्यानंतर
अनेक व्यक्तींना थुंकण्याची सवय असते. थुंकणे हे संसर्ग पसरवण्याचे एक
माध्यम आहे. या आजारावर काही प्रमाणात आळा घालणे व कोव्हिड -19 या साथरोगाची
जनजागृती होण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये तंबाखू मुक्तीसाठी जनजागृती होणे
गरजेचे आहे.
त्यामुळे येथील जिल्हा माहिती कार्यालयात प्रजासत्ताक
दिनानिमित्त तंबाखु मुक्तीची शपथ घेण्यात आली. यावेळी माहिती सहायक चंद्रकांत कारभारी,
वरिष्ठ लिपिक श्रीमती आशा बंडगर, सर्वसाधारण सहायक कैलास लांडगे, लिपिक चंद्रकांत गोधने
व संदेशवाहक परमेश्वर सुडे आदी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment