कोरोना विषाणूचा संसर्ग
रोखण्यासाठी
हिंगोली जिल्ह्यात
प्रतिबंधात्मक उपाययोजनाअंतर्गत नवे
निर्बंध लागू
--
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश
हिंगोली (जिमाका), दि. 09 : राज्यात कोविड-19 ओमायक्रॉन विषाणूचे झपाट्याने संक्रमण होत
असल्याने शासनाने दि. 8 जानेवारी, 2022 रोजी या साथरोगासंदर्भात उचित
प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत नियमावली व उपाययोजना लागू करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष जितेंद्र
पापळकर यांनी शासनाच्या दि. 8 जानेवारी, 2022 च्या शासन निर्देशानुसार कोविड-19
साथरोग संदर्भात प्रतिबंधात्मक नियमावली आणि उपाययोजना ह्या दि. 10 जानेवारी, 2022
चे मध्यरात्री 00.00 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत हिंगोली जिल्ह्यात नवे निर्बंध लागू
केले आहेत.
शासन व जिल्हा प्रशासनाच्या निर्देशाप्रमाणे निर्गमित केलेल्या
आदेशातील सर्व निर्देश, सूचना , अटी व शर्तीचे पालन करणे सर्व संबंधितांना
बंधनकारक असेल. कोविड-19 साथरोग संदर्भात शासनाच्या व जिल्हा प्रशासनाच्या
आदेशातील अटी व शर्ती, दंडाबाबत निर्देशाचे काटेकोर पालन करणे सर्व संबंधित
व्यक्ती, आस्थापना व शासकीय- निमशासकीय विभागांना बंधनकारक असून खालील अटी व
शर्तीचे पालन करणे सक्तीचे असेल.
1) जमावबंदी व संचारबंदी : सकाळी 5.00 ते रात्री 11.00 वाजेपर्यंत 5 हून अधिक लोकांना
जमावबंदी करण्यात येत आहे. रात्री 11 ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत नागरिकांना वैध
कारणाशिवाय बाहेर फिरण्यास मनाई असेल.
2)
शासकीय कार्यालयातील उपस्थिती :
कोणत्याही नागरिकांना संबंधित कार्यालय प्रमुखाचे लेखी परवानगीशिवाय कार्यालयात
प्रवेशास मनाई असेल. प्रमुख कार्यालयामध्ये नागरिकाशी चर्चेसाठी व्हीसीची सुविधा
कार्यान्वित करण्यात यावी. शासकीय बैठकीसाठी ऑनलाईन व्हीसी सुविधेचा वापर करण्यात
यावा. कार्यालयातील व बाहेरील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी ही बाब लागू असेल.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेळामध्ये आवश्यक बदल करण्यात येऊन शक्य असल्यास
वर्क फ्रॉम होमची सोय उपलब्ध करुन देण्यात यावी. सर्व शासकीय कार्यालयामध्ये कोविड
अनुरुप पध्दतीचे अनुकरण योग्यरित्या होत असल्याची खातरजमा संबंधित विभाग प्रमुख,
कार्यालय प्रमुख यांनी करावी. सर्व कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनर्स,
सॅनिटायझर मशीन उपलब्ध ठेवण्यात यावे.
3) खाजगी
कार्यालयातील उपस्थिती :
कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेळामध्ये आवश्यक बदल करण्यात येऊन शक्य असल्यास
वर्क फ्रॉम होमची सोय उपलब्ध करुन देण्यात
यावी. शक्यतो कार्यालयीन वेळा 24 तास करण्यात येऊन कर्मचाऱ्यांचे ड्यूटी
कालावधीमध्ये तशा प्रकारचे आवश्यक बदल करण्यात यावेत. ज्यात त्यांच्या प्रवासाच्या
वेळाचे विचार करण्यात यावेत. तथापि, महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधांनी
आवश्यक नियोजन करण्यात यावे. कोविड-19 लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यानांच केवळ
प्रवेश देण्यात यावेत. कार्यालयामध्ये कोविड अनुरुप पध्दतीचे अनुकरण योग्यरित्या
होत असल्याची खातरजमा संबंधित कार्यालय व्यवस्थापन प्रमुख यांनी करावे. सर्व
कार्यालयाचे प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनर्स, सॅनिटायझर मशील उपलब्ध ठेवण्यात
यावेत.
4) विवाह
कार्यक्रम : कोविड-19 निर्देशाचे
अधीन राहून, सामाजिक अंतर राखून केवळ 50 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार
पाडण्याची मूभा असेल. तथापि याचे उल्लंघन केल्यास 50 हजार रुपये दंड व सबंधितावर
गुन्हा दाखल करण्यात यावे. तसेच विवाह कार्यक्रम आयेाजित करत असल्याबाबत तहसील
कार्यालय व पोलीस स्टेशन यांना कळविणे अनिवार्य आहे.
5)
अंत्यविधी : कोविड-19 निर्देशाचे
अधीन राहून केवळ 20 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मूभा असेल.
6)
सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम इत्यादी ठिकाणाच्या गर्दीबाबत : कोविड-19 निर्देशाचे अधीन राहून केवळ 50 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम
पार पाडण्याची मूभा असेल. तथापि, सदर कार्यक्रमांची लेखी परवानगी संबंधित तहसीलदार
यांच्याकडून लेखी स्वरुपात घेण्यात यावेत. तथापि, याचे उल्लंघन केल्यास 50 हजार
रुपये दंड व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावे.
7) शाळा,
महाविद्यालये, कोचिंग क्लासेस :
सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस दि. 15 फेब्रुवारी, 2022
पर्यंत बंद असतील. तथापि, इयत्ता दहावी व बारावीचे शैक्षणिक क्रियाकरिता संबंधित
शिक्षण बोर्डाचे वेळोवेळी प्राप्त निर्देशाप्रमाणे शिक्षण विभागाने आवश्यक
कार्यवाही करावी. वर्गातील अध्यापनाव्यतिरिक्त प्रशासकीय बाबी व कार्यवाही
नियमितपणे शिक्षकांकडून करण्यात यावी. शिक्षण विभाग, तंत्र व उच्च शिक्षण विभाग,
कौशल्य विकास विभाग, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालविकास विभागाकडून वेळोवेळी
प्राप्त निर्देशाप्रमाणे सर्व संबंधित विभागानी आवश्यक कार्यवाही करावी. याशिवाय
सदर विभागांना इतर बाबींकरिता करावयाच्या नियोजनाकरिता राज्य आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून रितसर परवानगी घेणे बंधनकारक असेल.
8) स्पॉ,
वेलनेस सेंटर इत्यादी पुढील आदेशापर्यंत बंद असतील.
9)
व्यायामशाळा, जीम, ब्यूटी सलून, केश कर्तनालय : या ठिकाणी 50 टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची मूभा असेल. सदर
आस्थापना कर्मचारी यांचे लसीकरण असल्यासच आस्थापना उघडण्यास परवानगी असेल. लसीकरण
झालेल्या नागरिकांना दुकानात येण्यास परवानगी असेल. दररोज रात्री 10.00 ते सकाळी
7.00 पर्यंत सदर दुकाने बंद असतील. केश कर्तनालयात केश कर्तनाशिवाय इतर सर्व
प्रकारच्या कार्यांना मनाई असेल. कोविड अनुरुप वर्तन, निर्देश, नियमांचे पूर्ण
बंधन पाळण्यात यावेत. सर्वांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य असेल. सदर ठिकाणांमध्ये
एसीचा वापर करता येणार नाही.
10)
क्रीडा स्पर्धा इत्यादी : राष्ट्रीय
व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पूर्वनियोजित स्पर्धांना खालील अटी व शर्तीनुसार
परवानगी असेल. प्रेक्षकांना परवानगी नसेल. सर्व खेळाडू किंवा स्टाफ बायोबबल असेल.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसंदर्भात केंद्र शासनाचे निर्देश लागू असतील. प्रत्येक
तीन दिवसांनी आरटीपीसीआर, रॅपिड अँटीजेन टेस्ट करणे अनिवार्य असेल. गाव, शहर,
तालुका, जिल्हास्तरावरील कोणत्याही स्वरुपाच्या क्रीडा स्पर्धांना पूर्णत: मनाई
असेल.
11) मनोरंजनाची
स्थळे जसे की उद्याने, बागबगीचे, पार्क, किल्ले, प्रेक्षणीय स्थळे इत्यादी पुढील आदेशापर्यंत बंद असतील.
12) शॉपिंग
मॉल आणि बाजार संकुले : या
ठिकाणी 50 टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची मूभा असेल. तसेच सदर मॉल्सचे एकूण क्षमता
आणि ग्राहकांची संख्याबाबत प्रवेशद्वाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्पष्ट दिसेल अशा
ठळक पध्दतीने लावण्यात यावेत. कोविड अनुरुप वर्तन, निर्देश, नियमांचे पूर्ण बंधन
पाळण्यात यावेत. सदर ठिकाणी कोविड-19 च्या रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी बूथ उपलब्ध
ठेवण्यात यावेत. दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकानांच केवळ प्रवेश देण्यात यावे.
याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मॉल्स व्यवस्थापनाची असेल. दररोज रात्री 10.00 ते
सकाळी 8.00 पर्यंत सदर दुकाने बंद असतील.
13)
रेस्टॉरंट, उपहार गृह : सदर
ठिकाणी 50 टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची मूभा असेल. तथापि, सदर रेस्टॉरंटची एकूण
क्षमता आणि ग्राहकांच्या संख्येबाबत प्रवेशद्वाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्पष्ट
दिसेल अशा ठळक पध्दतीने लावण्यात यावेत. दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकानांच केवळ
प्रवेश देण्यात यावेत. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची असेल. दररोज
रात्री 10.00 ते सकाळी 8.00 पर्यंत सदर रेस्टॉरंट, उपहार गृह बंद असतील. पार्सल
सुविधा, होम डिलिव्हरी सुरु ठेवता येईल.
14)
नाट्यगृह, चित्रपट गृहे इत्यादी :
सदर ठिकाणी 50 टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची मूभा असेल. तथापि, सदर नाट्यगृह,
चित्रपट गृहाची एकूण क्षमता आणि ग्राहकांची संख्याबाबत प्रवेशद्वाराजवळ नोटीस
बोर्ड सर्वांना स्पष्ट दिसेल अशा ठळक पध्दतीने लावण्यात यावेत. कोविड अनुरुप
वर्तन, निर्देश, नियमांचे पूर्ण बंधन पाळण्यात यावेत. दोन्ही लसीकरण झालेल्या
नागरिकानांच केवळ प्रवेश देण्यात यावे. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित नाट्यगृह,
चित्रपट गृह व्यवस्थापनाची असेल. दररोज रात्री 10.00 ते सकाळी 8.00 पर्यंत सदर नाट्यगृहे,
चित्रपट गृहे बंद असतील.
15) आंतरराष्ट्रीय
प्रवास केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे असेल.
16)
देशांतर्गत प्रवास : महाराष्ट्र राज्यात
प्रवेश करताना दोन्ही लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा प्रवासाचे 72
तासादरम्यानचे आरटीपीसीआर नकारात्मक अहवाल सोबत असणे गरजेचे आहे. सदर बाब हवाई
वाहतूक, रेल्वे वाहतूक, रस्ते वाहूतुकीला लागू असेल. रस्ते मार्गांनी प्रवास
करणारे वाहनचालक, क्लीनर्स, इतर स्टाफ इत्यादींना सदर बाबींचे पूर्ण पालन करावे
लागेल.
17) कार्गो
सेवा वाहतूक, उत्पादन सेवा , बांधकाम कार्य इत्यादी : दोन्ही लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांसाठी सुरु असतील .
18)
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था : दोन्ही
लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांसाठी नियमितपणे सुरु असतील.
19)
केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, वैधानिक संस्था, सार्वजनिक संस्था
इत्यादी : राष्ट्रीय पातळीवरुन
आयोजित होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी केंद्र शासनाच्या निर्देशाचे पालन करणे
बंधनकारक असेल. या परीक्षासाठीचे प्रवेश पत्र हे अत्यावश्यक बाबीअंतर्गत वैध
हालचालीस वैध पुरावा असेल. राज्य पातळीवरुन आयोजित होणाऱ्या परीक्षांसदर्भात ज्या
परीक्षांचे ओळखपत्रे जारी करण्यात आले आहेत, अशा परीक्षा नियोजनाप्रमाणे घेता
येईल. तथापि, इतर सर्व परीक्षांसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची
पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल. सर्व परीक्षेदरम्यान कोविड अनुरुप वर्तन,
निर्देश, नियमांचे पूर्ण बंधन पाळण्यात यावेत.
20)
आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद असतील
.
वैद्यकीय, आपातकालीन सेवा, विमानतळ , रेल्वे स्टेशन, बस स्थानक
इत्यादी ठिकाणी वैध तिकीटासह प्रवास, जे कार्यालय 24 तास सुरु असतील अशा
कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी जमावबंदी व
संचारबंदी अंतर्गत हालचालीसाठी वैध असेल.
कोविड अनुरुप वर्तनासाठी तरतुदी या आदेशाप्रमाणे असेल. मॉल्स,
दुकाने, रेस्टॉरंट, उपहार गृहे, हॉटेल, ई-कॉमर्स सेवा , होम डिलिव्हरी, पार्सल
सेवांशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही लसीकरण पूर्ण असणे गरजेचे आहे. तथापि,
दोन्ही लसीकरणाशिवाय या आस्थापना कार्यरत असल्याचे निर्दशनास आल्यास अशा संबंधित
दुकाने, सेवा पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येऊन सदर व्यवस्थापनावर कारवाई
करण्यात येईल. ही दुकाने , सेवा संबंधित ठिकाणी वेळोवेळी कोविड-19 ची रॅपिड
अँटीजेन टेस्ट करण्यात यावी. जिल्ह्यातील कोविड-19 साथरोग व्यवस्थापनासाठी शासकीय,
निमशासकीय कार्यालये, संस्थामधील मनुष्यबळ, संसाधनाचे विनियोग करता येईल.
या आदेशाचे पालन न करणारी, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था
अथा समूह यांनी साथरोग प्रतिबंध कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005 तसेच
भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे
असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
हे आदेश आज दि. 9 जानेवारी, 2022 रोजी निर्गमित करण्यात येत असून
हे आदेश हिंगोली जिल्हा सीमा क्षेत्रात दि. 10 जानेवारी, 2022 च्या मध्यरात्री
00.00 ते पुढील आदेशापर्यंत लागू असेल. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. हिंगोली, पोलीस अधीक्षक, हिंगोली, सर्व उपविभागीय
अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प.-नं.पं. , तसेच सर्व संबंधित
अधिकारी , कर्मचारी यांची असेल.
*******
No comments:
Post a Comment