08 February, 2025

माजी सैनिकांकडून अशासकीय लिपिक टंकलेखकासाठी अर्ज आमंत्रित

हिंगोली (जिमाका), दि. 08 : हिंगोली, वाशिम, नांदेड व परभणी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक हवालदार, नायब सुभेदार, सुभेदार यांच्याकडून जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे अशासकीय लिपीक टंकलेखक पद भरण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी माजी सैनिक यांची भारतीय सैन्यात कमीत कमी 20 वर्षे लिपीक या पदावर सेवा केलेली असावी व त्यांना कार्यानयीन कामाबद्दल माहिती असावी. तरी सर्व जिल्ह्यातील माजी सैनिक हवालदार, नायब सुभेदार, सुभेदार यांनी अशासकीय लिपीक टंकलेखक या पदाच्या अर्जासोबत वैयक्तीक अर्ज (मोबाईल नंबर सह), माजी सैनिक ओळखपत्राची छायांकित प्रत, रोजगार कार्ड आणि सेवा पुस्तक (डिस्चार्ज बुक) दस्तावेज सोमवार (दि. 10) रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे जमा करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांच्याशी (8208613544, 9021208822) संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. *****

No comments: