21 February, 2025

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर

हिंगोली (जिमाका), दि.21 : सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर हे उद्या दि. 22 फेब्रुवारी, 2025 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत . त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर जि . नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता वसमत येथे आगमन करुन तेथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या बैठकीस उपस्थित राहतील. 1 वाजता वसमत येथून मोटारीने परभणीकडे प्रयाण. **

No comments: