11 February, 2025

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सुरक्षित इंटरनेट दिवस कार्यशाळा

हिंगोली (जिमाका), दि. ११ : येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सुरक्षित इंटरनेट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यशाळेचा एक भाग म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक विशेष व्याख्यान देण्यात आले. या व्याख्यानात मार्गदर्शन करताना जिल्हा सूचना विज्ञान केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी बारी सिद्दिकी यांनी सुरक्षित इंटरनेट पद्धती, सायबर सुरक्षा आणि जबाबदार डिजिटल वर्तनाचे महत्त्व याविषयावर माहिती दिली. व्याख्यानानंतर गुगल फॉर्म वापरून प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना क्यूआर कोड देण्यात आला. एकूण 143 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि पहिल्या तीन विद्यार्थ्यांना मोमेंटो, पुष्प व प्रमाणपत्र देऊन जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकारी यांच्या स्वाक्षरीने सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयीन कार्यक्रमाव्यतिरिक्त, सुरक्षित इंटरनेट दिवस आणि सायबर सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व व्हीसी रूम स्टुडिओमध्ये डॅशबोर्ड प्रदर्शित करण्यात आला. ******

No comments: