24 February, 2025

अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 24 : एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प हिंगोली या कार्यालयांतर्गत अंणगवाडी मदतनीस पदाच्या रिक्त असलेल्या हिंगोली नगरपालिका क्षेत्रातील 2, वसमत नगरपालिका क्षेत्रातील 1, औंढा नगर पंचायत क्षेत्रातील 2 आणि सेनगाव नगर पंचायत क्षेत्रातील 3 अंगणवाडी मतदनीसांची रिक्त पदे मानधन तत्वावर सरळ नियुक्तीने भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. यासाठी उद्या दि. 25 फेब्रुवारी ते 11 मार्च, 2025 या कालावधीमध्ये अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. याबाबतच्या सविस्तर सूचना बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी प्रकल्प) हिंगोली यांचे कार्यालय, श्रीप्रभा, बांगर नगर, हिंगोली-431513 येथील सूचना फलकावर व संबंधित नगरपालिका, नगर पंचायत येथील सूचना फलकावर लावण्यात आल्या आहेत, अशी माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. ***

No comments: