08 February, 2025

थकबाकी भरून वाहने ताब्यात घ्या अन्यथा लिलावाद्वारे विक्री - उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 08 : हिंगोली जिल्ह्यातील वाहनमालकांकडून विविध कर थकीत असल्यामुळे त्यांनी तात्काळ करभरणा करून आपली वाहने ताब्यात घ्यावीत अन्यथा त्यांची लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अश्विनी स्वामी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. जिल्ह्यातील विविध वाहनधारकांकडून थकीत पर्यावरण कर वसुलीसाठी त्यांची वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. अशा वाहनांना कार्यालाकडून यापूर्वीच नोटीस बजावण्यात आल्या असूनही संबंधित वाहनधारकांनी याची कोणतीही दखल घेतलेली नाही. मात्र, आता या वाहनधारकांना शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यांनी थकबाकी भरून आपली वाहने ताब्यात घ्यावीत, अन्यथा लिलावाद्वारे त्यांची विक्री करण्यात येणार आहे. हिंगोली बस डेपोमध्ये असलेली वाहने एमएच 07 सी 9779 स्लीपर बस, एमटीडी 3756 ट्रक, एमएच 38 ए 0184 एम/सी, एमएच 37 जे 0610 एलजीव्ही, एमएच 38 एफ 0315 ए/आर, तर नरसी नामदेव पोलिस स्टेशन येथील एमएच 38 के 3936 एम/सी, आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन येथील एमएच 26 टी 5248 ए/आर, एमएच 26 ई 2759 ए/आर, एमएच 40 एन 2597 एमजीव्ही, एमएच 14 एफसी 0169 टी/टॅक्सी, एमएच 299522 ऑनलाईन रेकॉर्ड केए 22ए 1789 क्रमांकाचे टिप्पर तसेच कुरुंदा पोलिस स्टेशन येथील एमएच 23-2272 एचजीव्ही अशी वाहने आहेत. तसेच वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन येथील एमएच 28 बी 6600 एचजीव्ही, एमएच 26 जी 4840 ए/आर, एमएच 26 जी 5009 ए/आर, एमएच 38 एफ 0643 ए/आर, एमएच 26 एल 0751 महिंद्रा मॅक्स, एमएच 26 एडी 5019 एलजीव्ही, एमएच 23 7755आणि एमएच 38 एफ 0608 ए/आर या क्रमांकाच्या वाहनांचा यात समावेश आहे. त्याशिवाय वसमत बस डेपोतील एमएच 30 ई 5095 एचजीव्ही, एमएच 22 एन 2372 एलजीव्ही, एमएच 26 जी 6242 ए/आर, एमएच 37 बी 0323 एलजीव्ही आणि एमएच 26 बी 7684 एलजीव्ही, एमएच 20 एटी 5606 एलजीव्ही या क्रमांकाची वाहने ताब्यात घेण्यात आलेली आहेत. कळमनुरी बस डेपोतील एमएच 26 एडी 0706 एचजीव्ही आणि एमएच 14 एफ 9291 एलजीव्ही या दोन वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे या वाहनांच्या विक्रीकरिता दिवस निश्चित केला आहे. दिवसापूर्वी शेवटची संधी म्हणून देय असलेली रक्कम व्याज उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांच्या कार्यालयात नोटीस प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून सात दिवसाच्या आत न भरल्यास हे वाहन जाहीर ई-लिलावाद्वारे विकण्यात येईल व त्यानंतर वाहनधारकांचा कोणताही दावा राहणार नाही, असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. *****

No comments: