21 February, 2025

वसमत येथे मंगळवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन

हिंगोली (जिमाका), दि.21 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल कॅरिअर सेंटर, हिंगोली आणि स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत येथे मंगळवार (दि.25) रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात श्री शिवेश्वर नागरी सहकारी बैंक लि. बसमतनगर, ईसाफ को-ऑपरेटीव्ह मायक्रो फायनांस नांदेड, शिवशक्ती अँग्रीटेक लिमिटेड, नांदेड, क्वेश कॉर्प पुणे, संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था हिंगोली, डॉ.जयप्रकाश मुंदडा अर्बन को. ऑपरेटीव्ह बँक जवळा बाजार, जया हुंदाई हिंगोली, भारत फायनान्स लि. हिंगोली, उत्कर्ष स्मॉल फायनांस बँक नांदेड, सॉपिओ आनेलिटिक्स नोडल एजंसी हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली, एसबीआय लाईफ इन्शुरन्स हिंगोली इत्यादी नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. तसेच हिंगाली जिल्ह्यातील शासनाच्या विविध महामंडळाचे स्टॉल या रोजगार मेळाव्यात लावण्यात येणार आहेत. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार 350 पेक्षा अधिक रिक्त पदे या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचित केली आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करून खाजगी क्षेत्रात नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करावे अथवा स्वतः मूळ कागदपत्रासह स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, वसमत येथे दिनांक 25 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 10 वाजता स्वखर्चाने उपस्थित रहावे. या मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाच्या 02456-224574 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे. ******

No comments: