21 February, 2025

अमला येथील शालेय परिसर व्यसनमुक्त

हिंगोली (जिमाका), दि.21 : चाईल्ड हेल्पलाईन 1098 कंट्रोल रूमकडून प्राप्त माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील अमला येथे शाळा लगत असलेल्या पानटपरीमध्ये गुटखा, तंबाखू, सिगारेट इत्यादी अंमली पदार्थ विक्री होत होते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी व्यसनाचे बळी होण्याची दाट शक्यता आहे, अशी गोपनीय माहिती चाईल्ड हेल्पलाईन 1098 कडून प्राप्त झाली होती. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अंतर्गत चाईल्ड हेल्पलाईनचे सनियंत्रण अधिकारी तथा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे व चाईल्ड हेल्प लाईनचे जिल्हा प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, केस वर्कर राजरत्न पाईकराव यांनी अमला गावातील ग्राम बाल संरक्षण समितीच्या अध्यक्षा सुनिता कामखेडे, सरपंच व ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी बी. एन. कोकरे यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार हिंगोली तालुक्यातील अमला येथील शालेय परिसरात १०० मीटरच्या आत गुटखा तंबाखू, सिगारेट अमली पदार्थ विक्री करणे हा गुन्हा आहे. याबाबत संबंधिताना मार्गदर्शन केले. त्यानुसार गावातील ग्राम बाल संरक्षण समिती व हिंगोली चाईल्ड हेल्प लाईन 1098 यांच्या समन्वयाने शालेय परिसर तात्काळ व्यसनमुक्त करण्यात आले आहे. *****

No comments: