19 February, 2025
चाईल्ड हेल्प लाईनमार्फत सेनगाव जिल्हा परिषद प्रशालेत जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 19 : सेनगाव येथील जिल्हा परिषद प्राशालेत चाईल्ड हेल्पलाईन 1098 कक्षाकडून बालकाशी निगडीत विविध विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी बाल विवाह म्हणजे काय, विवाहाचे योग्य वय, बाल विवाहाची कारणे, दुष्परिणाम याची माहिती देण्यात आली. बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार विवाह बेकायदा ठरतात आणि या विरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षीत आहे व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष सरपंच व सदस्य सचिव अंगणवाडो सेविका आहेत. या सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाही याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच मुलांच्या वयाची 18 वर्ष व मुलाच्या वयाची 21 वर्ष पूर्ण होण्याच्या आगोदर लग्न करणे हा कायद्याने गुन्हा असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी दिली.
पर्यवेक्षक श्रीकांत वाघमारे यांनी बालकाच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने बालकांना आरोग्य, शिक्षण इत्यादी बाबीवर मार्गदर्शन केले. बालकाला तात्काळ मदत करणारी हेल्पलाईन आहे. 1098 या टोल फ्री क्रमांकावर मिळालेली माहिती गोपनीय असते. बालकाला मदतीची गरज असल्यास, सापडलेले, हरवलेले, किंवा अडचणीत असलेले बालक किंवा एखाद्या बालकास शैक्षणिक अडचण असलेल्या बालकासाठी विविध योजनाची माहिती देण्यात आली. तसेच यावेळी 1098 या टोल फ्री क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment