14 February, 2025

जिल्ह्यातील उद्योगांशी संबंधित बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 14 (जिमाका): जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, (दि.17) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा उद्योग मित्र समिती सभा, जिल्हा सल्लागार समिती सभा, स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य जिल्हास्तरीय समिती सभा व आजारी उद्योग पुनरुज्जीवन जिल्हास्तरीय समिती सभा, जिल्हा निर्यात प्रचालन समिती सभा, डीएलटीएफसी संबंधित बैठकीचे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस जिल्ह्यातील औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी, उद्योजक संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत. तरी जिल्ह्यातील उद्योजकांनी आपल्या उद्योगाशी संबंधित अडी-अडचणी सोडविण्यासाठी व आपल्या समस्याचे निराकरण करण्यासाठी या बैठकांमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम यांनी केले आहे. ***

No comments: