19 February, 2025
जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
• ‘‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’’ या गीताचे सामूहिकरित्या गायन
हिंगोली (जिमाका), दि. 19 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड आणि उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, महसूल विभागाचे तहसीलदार आश्विनकुमार माने, नायब तहसीलदार सी. आर. गोळेगावकर, संतोष बोथीकर यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी ‘‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’’ या राज्य गीताचे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिकरित्या मोठ्या उत्साहात गायन करण्यात आले.
********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment