19 February, 2025
महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध
हिंगोली (जिमाका), दि. 19 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. 10 नोव्हेंबर, 2024 रोजी घेतलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024 पेपर 1 (इयत्ता पहिली ते पाचवी गट) व पेपर-2 (इयत्ता सहावी ते आठवी गट) चा अंतिम निकाल परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024 साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल वरील संकेतस्थळावर पाहता येईल. पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद / शिक्षण निरीक्षक मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम) यांच्यामार्फत पाठविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
**
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment