ठक्करबाप्पा योजनेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी 15 मार्च पर्यंत
मुदतवाढ
हिंगोली (जिमाका), दि. 03 : ठक्करबाप्पा
आदिवासी वस्ती सुधार योजनेच्या सुधारित मार्गदर्शक
सुचनेनुसार सन 2022-23 पासून ही योजना अंमलबजावणी करण्यासाठी शासन स्तरावरुन शासन निर्णय
निर्गमित करण्यात आला आहे.
ठक्कर बाप्पा योजनेचे सन 2022-23
साठीचे जिल्हास्तर व राज्यस्तर प्रस्ताव सादर करण्यासाठी 28 फेब्रुवारी, 2023 पर्यंत
मुदत देण्यात आलेली होती. प्राप्त प्रस्तावाची संख्या पाहता प्रस्ताव सादर करण्यासाठी
15 मार्च, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
हिंगोली व परभणी जिल्ह्यातील पंचायत
समितीच्या सर्व गट विकास अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयाच्या अधिनस्त येत असलेल्या
ग्रामपंचायत निहाय दि. 3 फेब्रुवारी, 2023 च्या आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयातील
विवरणपत्र एक मध्ये नमूद विविध कामांपैकी आर्थिक मर्यादेच्या अनुषंगाने कामांचा प्राधान्यक्रम
ठरवुन विविध कामांचे प्रस्ताव तयार करुन कामाच्या अंदाजपत्रकासह प्रकल्प कार्यालय,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी येथे दि. 15 मार्च, 2023 पूर्वी सादर करावेत,
असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी छंदक लोखंडे यांनी केले
आहे.
*****
No comments:
Post a Comment