03 March, 2023

 

निदेशक व संगणक ऑपरेटर पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 03 :  वसमत येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांना ‘एम्प्लॉयबिलिटी स्कील’ या विषयाची तासिका घेण्यासाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात 11 महिने कालावधीसाठी मानधन तत्वावर निदेशकाची नेमणूक करावयाची आहे. तर  पीपीपी अंतर्गत आयएमसीमध्ये संगणकावरील व इतर विविध कामे करण्यासाठी  निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात 11 महिने कालावधीसाठी मानधन तत्वावर संगणक ऑपरेटरची नेमणूक करावयाची असल्याने वरील दोन्ही पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

            ‘एम्प्लॉयबिलिटी स्कील’ निदेशक पदासाठी उमेदवार आयटीआयचा कोर्स पूर्ण करुन सीटीआय पास असणे आवश्यक/डिप्लोमा इन इंजिनिअरींग/कोणत्याही शाखेतील इंजिनिअरींगची पदवी असणे आवश्यक आहे.

            संगणक ऑपरेटर पदासाठी उमेदवार बीसीए, बी.कॉम पदवीधारक किंवा एमसीए एम.कॉम पदव्युत्तर असावा. तसेच उमेदवार मूळ पात्रता प्राप्त केल्यानंतर संगणकावर काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

पात्र उमेदवारांनी दिनांक 15 मार्च, 2023 पर्यंत आपला बायोडाटा किंवा अर्ज मूळ शैक्षणिक कागदपत्रासह औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत  जि. हिंगोली येथे सादर करावेत, असे आवाहन प्राचार्य,औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वसमत जि.हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*****

No comments: