रोजगार मेळाव्यात 215 बेरोजगार उमेदवारांची प्राथमिक निवड
हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार
व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर (NCS) हिंगोली व शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 20 मार्च, 2023
रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसमत येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारासाठी
रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या रोजगार मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी,
बारावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवी तसेच पदवीधारक या पात्रतेचे 513 उमेदवार उपस्थित
होते. यापैकी 215 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. या रोजगार मेळाव्यात
महाराष्ट्रातील नामांकित कंपनीचे उद्योजक उपस्थित होते.
या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे, जिल्हा व्यवसाय
शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही. पी. रांगणे, वसंतराव पालवे, औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेचे प्राचार्य कोंडावार उपस्थित होते.
यावेळी सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी सुशिक्षित बेरोजगार
उमेदवारांना नोंदणीसाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला असल्याची माहिती दिली. या
क्यूआर कोडवर एका नोंदणी केल्यावर आपणास रोजगार उपलब्ध होईपर्यंत वेळोवेळी घेण्यात
येणाऱ्या रोजगार मेळाव्याची माहिती आपणास मिळत राहील. मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण
घेण्यासाठी व करिअर कसे निवडावे याबाबत नॅशनल करिअर सेंटरची स्थापना जिल्हा कौशल्य
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयात करण्यात आली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहनही डॉ. कोल्हे
यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष परदेशी व नवनाथ टोनपे यांनी केले.
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी
व्ही. पी. रांगणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी म. शां.
लोखंडे, रा. द. कदम, म. ना. राऊत, अ. अ. घावडे, ना. ज. निरदुडे, र. ला. जाधव यांनी
परिश्रम घेतले.
*****
No comments:
Post a Comment