आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्य पाककला स्पर्धाचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 26 : आंतरराष्ट्रीय पौष्टिक
तृणधान्य वर्ष 2023 या संकल्पनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी इत्यादी पौष्टिक
तृणधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोरच या पिकांचे आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती
करुन लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
त्यामुळे ज्वारी व बाजरी
पासून तयार होणाऱ्या पदार्थाच्या पाककला स्पधे्रचे आयोजन करण्यात आले आहे. ज्वारी,
बाजरी, नाचणी इत्यादी पौष्टिक तृणधान्यांपैकी हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्वारी
पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र आहे. त्यामुळे ज्वारी, बाजरी पासून बनणाऱ्या विविध
पदार्थाची महिलांसाठी पाककला स्पर्धा दि. 28 मार्च, 2023 रोजी आयोजित करण्यात आली
आहे.
येथील रामलीला मैदानावर
आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कृषि महोत्सवातील स्टॉल क्र. 54 वर सहभागासाठी
इच्छुक महिलांची नावे नोंदवावीत. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट ठरणाऱ्या पहिल्या तीन
क्रमांकाना बक्षीसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त
महिलांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,
हिंगोली यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment